डोंबिवली : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष आणि खा डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्र ५१ आणि वॉर्ड ५२ मधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथील हरिहरेश्वर सोसायटी येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरात किडनी स्टोन शस्त्रक्रिया, नाक, कान, घसा तपासणी, कॅन्सर, ईसीजी, ऍन्जिओग्राफी, एन्डोप्लास्टी आदी चाचण्या पार पडल्या. तसेच डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीरासाठी उमेशनगर, गोपीनाथ चौक, देवीचापाडा, अनमोल नगरी, गरीबाचावाडा आदी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हेाती. त्यामुळे सकाळपासूनच शिबीरास्थळी तपासणीसाठी नागरिकांची मोठी रांग लागली होती.
या शिबीराचे आयोजन ज्येष्ठ माजी नगरसेवक, माजी सभापती वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, समाजसेवक गोरखनाथ (बाळा) म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे, युवा सेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी यशस्वीपणे केले. यावेळी शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.