डोंबिवली : गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभाग क्र ७७ दत्तनगर परिसरात काँग्रेसचे डोंबिवली पूर्व बी ब्लॉक उपाध्यक्ष प्रणव केणे यांच्या पुढाकाराने मोफत शिबीराचा धुमधडाका सुरू आहे. लहान बालकांपासून ते वयोवृध्दांपर्यंत अशाच सर्वच वयोगटासाठी मोफत शिबीर राबविले जात आहे. बालकांना मोफत लसीकरण, नेत्रतपासणी व चष्मे वाटप तसेच ज्येष्ठांसाठी मोफत प्रवासाचे ओळखपत्र, महागडया असललेल्या रक्तातील विविध तपासण्या या शिबीरात मोफतपणे पार पडल्या. शेकडो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी राहुल केणे आणि प्रणव केणे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे उत्कृष्टपणे आयोजन करण्यात आले. जुना आयरे रोड परिसरातील नागेश्वर नवनाथ ध्यान मंदिर शेजारील मैदानात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह, कोलेस्ट्रॉल, कॅल्शिअम, किडनी व लिव्हर संबंधीत रक्तातील तपासण्या करण्यात आल्या. या चाचण्या करण्यासाठी साधारण पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. मात्र शिबिरात मोफत चाचण्या करण्यात आल्या. प्रभागातील शेकडो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. तसेच केंद्र सरकारची मातृत्व वंदन योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांना या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी नोंदणी प्रक्रीया राबविण्यात आली होती. कोरोना काळात पालिकेच्या कोविड केंद्रात काम करणाऱ्या कोविड योद्धांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ ढाके मॅडम यांचा शिबीरात खारीचा वाटा उचलला.
मागील आठवडयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास, मतदार नोंदणी व मतदार ओळखपत्र, मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. एसटी महामंडळाच्या बसचा चार हजार किमी पर्यंतचा प्रवास ज्येष्ठांना मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी करण्यात आली. तसेच नेत्रतपासणी व मतदार नोंदणी व ओळखपत्र शिबीरही पार पडले पाचशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी प्रणव केणे यांनी दिली. आयरे परिसरात बालकांसाठी मोफत लसीकरण शिबीर पार पडले. मोफत शिबीराचे आयोजन केल्याबद्दल प्रणव केणे यांचे नागरिकांनी आभार मानले.
———