अयोध्या, 15 जानेवारी : अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या रामलला मंदिरात सोन्याचे दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावर एकूण 14 सोन्याचे दरवाजे बसवण्यात आले आहेत.
मंदिराच्या गर्भगृहातील दरवाजा सुमारे 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहे. दरवाजाच्या चौकटीच्या वर, भगवान विष्णूचे निद्रावस्थेतील चित्र कोरलेले आहे. राम मंदिरात एकूण 46 दरवाजे बसवण्यात येणार असून त्यापैकी 42 दरवाजे 100 किलो सोन्याने मढवलेले असतील.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या तळमजल्यावर सर्व 14 सोन्याचे दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. राम मंदिरातील पहिला सोन्याचा मुलामा असलेला दरवाजा सोमवारी (८ जानेवारी) बसवण्यात आला. सोमवारी सर्व दरवाजांचे काम पूर्ण झाले.