कल्याण : दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या चार सराईत दरोडेखोरांना पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे अजीम काझी, अराफत शेख, अन्वर शहा, अरबाज इस्माईल शेख असे चार सराईत दरोडेखोरांची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी धारदार शस्त्र, मिरचीपूड आदी साहित्य आणि रिक्षा हस्तगत केली आहे.
कल्याण एपीएमसी मार्केट जवळील धान्य बाजार परिसरात व्यापाऱ्याला धारदार शस्त्राच्या साह्याने लुटणार असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुखवते, पोलीस हवालदार सचिन साळवी, घुगे, आंधळे, फड, पावशे, भालेराव यांच्या पथकाने सापळा रचून अजीम काझी अराफत शेख, अन्वर शहा, अरबाज इस्माईल शेख या चार सराईत आरोपींना धारदार सशस्त्रासह अटक केली आहे त्यांच्याकडून एक रिक्षा ,दोन लोखंडी सुरे एक लोखंडी चाकू,मोबाईल फोन मिरची स्प्रे, रोख रक्कम आणि प्राणघातक हत्यारे बाजारपेठ पोलिसांनी हस्तगत केली आहे,
दरम्यान पोलीसाची माहिती मिळतात यांच्यासोबत असलेल्या तीन दरोडे खोरांनी पळ काढला असून बाजारपेठ पोलीस त्यांचाही शोध घेत आहे पोलिसांच्या माहितीनुसार सर्व आरोपी एक सराईत गुन्हेगार असून यांच्यावर जनावर चोरी दरोडे घरपोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून यांनी अजून कल्याण मुंबई बरसात किती गुन्हे केले आहे याचा तपास बाजारपेठ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुखवते करीत आहेत.