मराठी भाजी विक्रेत्याला मारहाण,

डोंबिवली, दि.03 : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर परप्रांतीय फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करून दोन बोट छाटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री डोंबिवली पूर्वेत चौघा परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण करून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परप्रांतिय फेरीवाल्यांची दादागिरी पून्हा एकदा चव्हाटयावर आली आहे.

सांगर्ली येथे राहणारे परशुराम मल्याली ,जयेश मल्याली, सुभाष मल्याली आणि विष्णू मल्याली या चौघांनी गोळवली गावात राहणारे कमलाकर पाटील यांना बेदम मारहाण केली. पाटील दांम्पत्य हे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी जोरात ओरडून व्यवसाय करीत होते मात्र या चौघांनी त्यांना जोरजोरात ओरडून भाजी विक्री करू नका असे धमकावित बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *