दिल्ली – भाजपने पहिल्या यादीत विदर्भातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली होती. परंतु, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोलीच्या जागेवरील नावे जाहीर केली नव्हती. आज अमरावती वगळता इतर दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भंडारा-गोंदियातून विद्यमान खासदार सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर मतदार संघातून विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुनील मेंढे यांच्याऐवजी भाजप नवा चेहरा देणार अशी चर्चा होती. परिणय फुके यांचे नाव चर्चेत होते. पण मेंढे यांनी बाजी मारली. भंडारातून काँग्रेसचे उमेदवार पडोळे विरोधात सुनील मेंढे अशी लढत होणार आहे.
भारतीय जनता पक्षाची तिसरी गडचिरोली व भंडारा-गोंदियात पक्षाच्या विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखण्यात आला आहे. अमरावतीच्या उमेदवाराचा तिढा मात्र कायम असल्याने तेथील नावाची घोषणा करण्यात आली नाही. गडचिरोली-चिमूर मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला होता. विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे येथून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. भाजपची ही जागा असतानाही राष्ट्रवादीच्या दबावामुळे पक्षाने उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपने राष्ट्रवादीचा दबाव मोडून पुन्हा येथे विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी दिली. काँग्रेसने गडचिरोलीतून डॉ. नामदेव किरसान यांना उमदवारी दिली आहे.