डोंबिवली: जपानमध्ये नुकत्याच झालेल्या शिडोकान कराटे ओपन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप-2023 मध्ये डोंबिवलीतील चार खेळाडूंनी भाग घेतला आणि पदक जिंकून भारताचा गौरव केला.

जपानमध्ये शिडोकान कराटे ओपन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप-2023 चे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये भारत, जपान, चीन अशा 68 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये भारताच्या 13 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये बंगालमधील 8 आणि महाराष्ट्रातील डोंबिवली शहरातील 4 खेळाडूंचा समावेश होता. डोंबिवलीत राहणारे श्रीतेश पायनाईक (२६ वर्षे), मधुरा नाईक (२१ वर्षे), हर्षिता परशुरामी (१६ वर्षे) आणि अमोघ बागुल (१४ वर्षे) या चार खेळाडूंनी जपानला जाऊन विविध वजन गटात चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. 26 वर्षीय श्रीतेश पायनाईक याला द्वितीय क्रमांक, 21 वर्षीय मधुरा नाईक हिला द्वितीय, 16 वर्षीय हर्षिता परशुरामी हिला तृतीय क्रमांक मिळाला तर 14 वर्षीय अमोघ बागुलला सर्वोत्कृष्ट तांत्रिक लढतीचा किताब देण्यात आला अशी माहिती प्रशिक्षक शिहान चिक्काला श्रीनिवास राव यांनी दिली. या चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंनी अनेक महिने मेहनत घेतली होती. डोंबिवलीच्या खेळाडूंनी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकल्याबद्दल डोंबिवलीकरानी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!