एका निनावी पत्राने उघड केलेले रहस्य
मुंबई – महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की राज्यपाल असलेल्या कोश्यारीच्या शिक्षण संस्थेने अनंत अंबानी यांच्याकडून १५ कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे.
भगतसिंग कोश्यारीसारख्या माणसाने आपल्या पदाचा उपयोग करून उत्तराखंड मधील एका शाळेच्या नावाने भरपूर माया गोळा केली आहे. १०० सुद्धा मुले नाहीत अशा शाळेकरिता कोट्यावधीच्या देणग्या गोळा केल्या आहेत. त्या पैशातून आपला पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करून तिथे रिसोर्ट चालू केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी १५ कोटी रुपये घेतले आहेत. शेर सिंग कार्की सरस्वती विहार, डिगरा मुवानी, चामू, कनालीछीना, पिथौरागढ उत्तराखंड देवस्थळी यांच्या नावाने भरपूर संपत्ती गोळा केली आहे. २०१९ पूर्वी सस्थांना किती देणग्या मिळाल्या आणि २००९ ते २०२३ या कालावधीत किती देणग्या मिळाल्या या तुलना सहज करता येऊ शकेल. Devbhumi Shiksha Prasar Samiti, Nainital Bank Haldwani Branch, Account No-0561000000000310 अशी माहिती आहे. याशिवाय SBI मधील एका खात्यातही अनेक व्यवहार केले गेले आहेत.
अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआयद्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती. आता या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.