डोंबिवली : १४३ डोंबिवली विधानसभा मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या १ लाख १७ हजार ९२ इतकी आहे. त्यामुळे बोगस आधारकार्डच्या आधारे मतदान होऊ शकते, आणि खरे मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे हे मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांना फोटो ओळखपत्राशिवाय मतदान करण्यास देऊ नये. आगामी कल्याण डेांबिवली महापालिकेच्या निवडणुका नि:पक्षपातीपणे व्हाव्यात,  यासाठी शासकीय यंत्रणेने दक्षता घ्यावी अशी भिती़- वजा मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी स्थायी समिती सभापती वामन सखाराम म्हात्रे यांनी राज्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकास सचिव यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

१४३ डोंबिवली विधानसभा मतदार यादीत ३,७५,१५६ मतदार असून, त्यातील छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या १,१७,०९२ आहे. मयत मतदारांची संख्या ९९४, स्थलांतरीत झालेल्या मतदारांची संसख्या १४१८३ इतकी आहे. यादीत फोटेा नसलेल्या मतदारांना फोटो आय.डी. शिवाय मतदान करून देऊ नये अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. ज्या मतदारांचे यादीत फोटेा नाहीत अशा फोटेा नसलेल्यांमुळे बोगस आधारकार्डाचा आधार घेवून अथवा राजकीय दबावाखाली मतदार करू शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे २०१५ च्या महापालिका निवडणूकीत प्रभाग क्र ५१ आणि ५६ मध्ये बोगस मतदान झाल्याचा आराेपही म्हात्रे यांनी सदर पत्रात केला आहे. त्यामुळे बोगस आधारकार्ड तपासण्याची यंत्रणा मतदान केंद्रावर पुरविण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे जेणेकरून कोणत्याही मतदाराचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये आणि कोणीही बोगस आधारकार्डाच्या आधारे निवडून येऊ नये याकडे वामन म्हात्रे  यांनी  निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. तसेच मतदार यादीत फोटो देण्यासंदर्भात मतदारांना संधी देऊनही दिला जात नसेल तर अशांवर उचित कार्यवाही करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे

काय आहे निवडणूक आयोगाचे म्हणणे

मतदार यादीमध्ये जवळपास १०० टक्के मतदारांचे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत मतदारास मत देण्याची परवानगी देताना त्याचा मतदार यादीतील फोटो तसेच त्याच्या ओळखीचा पुरावा तपासण्यात येतो याबाबत राज्य निवडणूक आयेागाचे ८ नोव्हेंबर२०११ चे आदेश आहेत तथापि राज्य निवडणूक आयेागाने बोगस मतदारांबाबत येणा-या तक्रारींच्या अनुषंगाने अशा मतदारांचे अधिकचे पुरावे तपासण्याबाबत ११ ऑक्टोबर २०१० अन्वये आदेश दिलेले आहेत असे राज्य निवडणूक आयेागाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *