कल्याण :  शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकूंद कोट यांनी केडीएमसीचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांना मारहाण केल्याचा प्रकार उपायुक्तांसमोर घडलाय. याप्रकरणी कोट यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


मोहने येथील जुने मंदिर मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी ते मंदिर तोडून नवीन मंदिराचे बांधकाम केले जात होते. या प्रकरणी पालिकेकडे बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अ प्रभाग क्षे़त्र अधिकारी राजेश सावंत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत सदर बांधकामावर कारवाई केली, त्यामुळे नागरिक संतप्त झाले. शहरातील इतर बांधकामावर कारवाई न करता केवळ मंदिरावा कारवाई केली जात असल्याने नागरिक संतप्त होऊन त्यांनी कर्मचा-यांना धक्काबुक्की केली यावेळी माजी नगरसेवक कोट यांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी सावंत यांच्या कानशिलात लागावली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!