दिवा:– दिवा येथील भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, अरविंद सावंत लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रोहिदास मुंडे त्यांच्यासह राजश्री मुंडे, कल्पिता मुंडे, विकास इंगळे, नागेश पवार, प्रशांत आंबोणकर, मूर्ती मुंडे, शनिदास पाटील, संजय जाधव, बैद्यनाथ पाडी, अक्षय वनगुळे, सागर पवार, सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग,सचिन विश्वकर्मा, यांच्यासह दिव्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत असतात. भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते. आता मुंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *