नवी दिल्ली, 27 डिसेंबर : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज सकाळी दाट धुके आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम बस, रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज ते शुक्रवार असे तीन दिवस सकाळी अत्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. बुधवारी कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सात अंश सेल्सिअस राहील, असे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यांचे विभागीय अधिकारी म्हणण्या अनुसार आज सकाळी हरियाणा, पंजाब, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंडमध्ये दाट धुके असणार. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही धुक्यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात एक ते दीड अंश सेल्सिअसने घट झाली आहे. बुधवारी सकाळी 6 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये पारा 7.6 अंश सेल्सिअस आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि प्रयागराजमध्ये किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले.
मंगळवारी दाट धुक्यामुळे, IGI विमानतळ दिल्लीजवळ सकाळी 7 ते 10 पर्यंत दृश्यमानता केवळ 50 मीटर होती. त्यामुळे विमानसेवा प्रभावित झाली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्येही प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी दिल्लीचा AQI 450 नोंदवला गेला.
भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीपच्या किनारी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धुक्यामुळे मेरठ द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहनांचा वेग ताशी ३० किलोमीटर इतका राहिला. ईस्टर्न आणि वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग जेमतेम 20 किलोमीटर प्रति तास होता. दिल्लीला पोहोचणारी 12 उड्डाणे वळवण्यात आली. 14 ट्रेन काही तासांच्या विलंबाने दिल्लीला पोहोचल्या.