कल्याण ते आसनगाव स्थानकादरम्यान आज ५ तासाचा मेगाब्लॉक

कल्याण : एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराने आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारीचं काम हाती घेतलय हे काम अंतिम टप्यात असून, पुलावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या आंबिवली ते आसनगाव स्थानकादरम्यान गुरूवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 54 लोकल रद्द केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलय. त्यामुळे लोकलच्या फेऱ्यांसह लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार आहे.
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मुंबईतल्या सर्वच पादचारी पुलांची रेल्वेने पाहणी केली होती. त्यामध्ये आंबिवलीचा पूल अतिधोकादायक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल उभारणीचे आदेश सरकारने दिले. पुलाची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी हे काम आर्मीकडे सोपविण्यात आलय. ३१ जानेवारीपर्यँत हे काम पूर्ण करण्याचे आर्मीने मुदत दिली होती मात्र मुदतीत हे काम पूर्ण होत असून या पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पाच तासाचा मेगाब्लॅाक घेतला जाणार आहे. या पुलाच्या उभारणीसाठी आर्मीची इंजिनिअरींग टीम आंबिवलीत कामाला लागलीय. आर्मीने उभारलेल्या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, युद्धजन्य परिस्थितीत उभारला जाणाऱ्या पुलाच्या साहित्यातून हा पूल उभारण्यात आला असून डोकलामवरुन हे साहित्य मागवण्यात आलं आहे. या पुलावरुन अगदी 40 टनांचा रणगाडा गेला, तरी काहीही फरक पडणार नाही, असा दावा आर्मीने केलाय.
मेगाब्लॉकदरम्यान एसटीची विशेष बससेवा
कल्याणच्या पुढे आसनगावपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कसारा, टिटवाळा, आंबिवली या भागातल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा आणि शहापूरसाठी कल्याण तसंच विठ्ठलवाडी डेपोतून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. यासाठी 10 ते 12 बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. केडीएमटीच्या बसेसच्याही या काळात विशेष फेऱ्या होणार असून प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी एसटी प्रशासन सज्ज असल्याचं एसटी महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
या गाडया रद्द ..
“सीएसएमटीहून टिटवाळा/आसनगाव/कसाऱ्याला जाणाऱ्या गाड्या सकाळी 9.12 ते दुपारी 1.30 पर्यंत रद्द केल्या आहेत. तर कसारा/आसनगाव/टिटवाळ्याहून सीएसएमटीला येणाऱ्या गाड्या सकाळी 9.54 पासून दुपारी 3.02 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलीय.
या एक्स्प्रेसची वेळ बदलली
12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस आज 04.45 ऐवजी 07.30 वाजता सुटेल.
या गाड्यांवर परिणाम
12118 मनमाड- एलटीटी गोदावरी एक्सप्रेस 18.1.2018 रोजी मनमाडवरुन सुटणार.
12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस 18.1.2018 रोजी एलटीटीहून सुटणार.
12188 सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस 18.1.2018 रोजी सीएसएमटीवरुन सुटणार.
या गाडया थांबवल्या जाणार
11094 वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस आटगाव इथे 12.27 वाजल्यापासून 14.25 पर्यंत थांबवली जाईल. ही ट्रेन दादरपर्यंतच धावेल.
12142 पाटलीपुत्र-एलटीटी एक्सप्रेस खर्डी इथे 13.33 वाजल्यापासून 14.20 वाजेपर्यंत थांबवली जाईल. 15.15 वाजता सुटून 16.45 वाजता एलटीटी पोहोचेल.
ही मेल/एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट
12139 सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही सीएसएमटी ते नाशिक रोडदरम्यान रद्द केली जाईल. त्यामुळे ही एक्स्प्रेस नाशिक रोड ते नागपूरपर्यंतच धावणार.
या मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले
1. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 11059 एलटीटी-छपरा एक्सप्रेस वसई रोड/सूरत/ जळगावला वळवली जाईल.
2. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 12542 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस वसई रोड/सूरत/जळगावला वळवली जाईल.
3. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 15548 एलटीटी-जयनगर जनसाधारण एक्स्प्रेस वसई रोड/सूरत/ जळगावला वळवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!