ठाणे : ठाण्याच्या तलावपाळी परिसरात तरूणाई रस्त्यावर उतरली होती. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तरूणाईचा सळसळता उत्साह पाहावयास मिळाला. मासुंदा तलाव परिसर तरूणाईने फुलून गेला होता.
ठाणे शहरातील तलावपाळी परिसरात दिवाळीला तरुण-तरुणी पारंपरिक पोशाखात एकत्र येतात आणि दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली होती. पण यावेळी निर्बंध शिथिल झाल्यानं तरुणाईनं पुन्हा एकदा मासुंदा तलाव परिरात एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. ठाण्याच्या ऐतिहासिक मासुंदा तलावाचं नुकतचं सुशोभीकरण करण्यात आलय. तलाव परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. नव्यानं नटलेल्या मासुंदा तलावावर आज तरुणाईने मोठया उत्साहाने दिवाळी साजरी केली.