मुंबईत आगीचे सत्र थांबेना, पून्हा सात दुकानं आगीत खाक :  अवघ्या २२ दिवसात  ३१ जणांचा बळी

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाच सोमवारी मध्यरात्री रे रोडवरील परिसरात पून्हा आगीत सात दुकान खाक झाली आहेत. अवघ्या २२ दिवसात आगीच्या घटनांमध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागले आहेत

.डॉकयार्ड रोड येथील  जमेरिया बिल्डिंगमधील गोदामाला रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने सात दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सिलेंडरच्या स्फोट झाल्याने आग लागल्याचे बोलले जात असले तरी सुध्दा आगीचे नेमक कारण अजूनही स्पष्ट झालेल नाही. १८ डिसेंबर २०१७ ला  साकीनाका येथील भानू फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ मजुरांचा मृत्यू झाला. तेव्हापासून आगीचे सत्र सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच कमला मिल कंपाउंडमधील मोजो ब्रिस्टो आणि वन अबव्ह या रेस्टो बारमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. ४ जानेवारीला अंधेरी येथील मरोळमधील मैमून मेन्शन या इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चारजणांना जीव गमवावा लागला. याच दिवशी विलेपार्लेतील प्राइम मॉलमध्ये आग लागली ही आग दुपारच्या वेळेत लागल्याने लगेचच विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ५ जानेवारीला मुंबई सेंट्रलमधील जिया अपार्टमेंटमध्ये तळघरात तर सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये म्हाडा कॉलनीत आग लागून, एका इमारतीतील ४ घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.६ जानेवारीला कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओत ‘बेपनाह’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आग लागली. अग्निशमन दलाने दीडशे लोकांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या घटनेत आॅडिओ अस्टिस्टंट गोपी वर्मा याचा मृत्यू झाला.  ६ जानेवारील लोअर परळच्या शिवशक्ती इमारतीत तर ८ जानेवारीला  सत्र न्यायालयाच्य तिसºया मजल्यावर आग लागली. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *