कमला मिल्समध्ये अग्नितांडव : 14 जणांचा मृत्यू, तर 16 जण जखमी

मुंबई :  लोअर परेल येथील कमला मिल्स ट्रेंड हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर  रात्री 12:30 वाजता लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय..आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, तर 16 जण जखमी झालेत. जखमींचा  आकडा वाढण्याची शक्यता आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या इमारतीमध्ये तीन हॉटेल आहेत. ज्यात हॉटेल मोजेज बिस्त्रो, वन अबव आणि लंडन टॅक्सीचा समावेश आहे. आग लागली तेव्हा अडकलेले लोक बाथरुममध्ये जाऊन लपले आणि आग वाढल्याने त्यांचा गुदमरुन तिथेच मृत्यू झाला. हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत,” असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मृतांची नावं :
प्रमिला
तेजल गांधी (वय वर्षे 36)
खुशबू मेहता (वय वर्षे 28)
विश्वा ललानी (वय वर्षे 23)
पारुल लकडावाला (वय वर्षे 49)
धैर्य ललानी (वय वर्षे 26)
किंजल शहा (वय वर्षे 21)
कविता धरानी (वय वर्षे 36)
शेफाली जोशी
यशा ठक्कर (वय वर्षे 22)
सरबजीत परेला
प्राची खेतानी (वय वर्षे 30)
मनिषा शहा (वय वर्षे 47)
प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!