पेटत्या सिगारेटने लागली आग, आरपीएफच्या पोलिसांनी आणली आटोक्यात

घाटकोपर (निलेश मोरे) :  पूर्वेतील रेल्वे पुलाखाली असलेल्या कचऱ्यात  अज्ञात व्यक्तीने सिगरेटचा जळता तुकडा टाकल्याने कचऱ्यातील प्लास्टिकने पेट घेऊन आग लागली. मात्र आगीमुळे    परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. हा प्रकार दुपारच्या सुमारास घडला. आरपीएफच्या पोलिसांनी समयसूचकता दाखवीत आग आटोक्यात आणली.
रेल्वे स्थानक परिसरात पसरलेल्या धुरामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. एका जळत्या सिगरेटने पेटलेली आग इतकी मोठी दिसत होती की आगीचे धुरांडे मेट्रो स्थानक पर्यंत पोहोचले.   रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या आरपीएफच्या पोलिसांनी स्थानक परिसराची तपासणी केली असता पूर्वेकडील नीलयोग मॉल समोरील रेल्वे पुलाखाली साचलेल्या कचऱ्यात ही आग लागल्याचं निदर्शनात आले. आरपीएफ पोलिसांनी पाणी टाकून हि आग विझवली . पोलिसांच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात यश आले अन्यथा आग पसरत गेली असती तर रेल्वे रुळपर्यंत पोहचण्याचा धोका होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *