साकीनाका परिसरात भानू फरसाण दुकानाला भीषण आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई ( निलेश मोरे ): आज पहाटेच्या सुमारास साकीनाका परिसरातील खैराणी रोडवरील भानू फरसाण कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत १२ जणांचा मृत्यू झालाय. या आगीमुळे दुकानाचा काही भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जातेय. जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  लक्ष्मी नारायण मंदिरा समोर हे दुकान असून पहाटे अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या कारखान्यातील अतिशय लहान जागेत विजेची वायरिंग, फर्निचर, इ. गोष्टींचा साठा होता. आग लागली त्यावेळी १० ते १५ कामगार काम करत होते. त्यापैकी काही जण बाहेर पडले मात्र, अनेक जण या आगीत अडकले आहेत.अग्निशमनदलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. १०८ रुग्णवाहिका, ४ मोठे टँकर देखील दाखल झाले होते.  मृतांची ओळख पटली नसून, आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

मृतांची नावे
१ वसिम सलीम मिर्झा
२ भोला
३ लल्‍लू
४ सल्‍लूभाई उर्फ मनोहर पंडित
५ राजू यादव
६ लम्‍बू
७ नईम सलीम मिर्झा
८ रामनरेश सोनू गुप्‍ता
९ गुलाम अली छेदी खान
१० जितेंद्र
दोघांची ओळख पटलेली नाही

https://youtu.be/IFajvJnl0Fo

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!