मुंबईत पून्हा अग्नितांडव : एका कुटूंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईतील कमला मिल आगीची धग अजूनही विझली नसतानाच मुंबईत पून्हा एकदा भीषण आगीने चार जणांचा बळी घेतलाय. अंधेरीच्या मरोळ परिसरातील मेमून या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घरात  मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत एकाच कुटूंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. या इमारतीमधून सतरा जणांची सुटका करण्यात आली. पाचजण जखमी असून त्यांना उपचारासाठी कूपर आणि होली स्प्रीट रूग्णालयात दाखल करण्यात आलय.

मेमून ही तळ अधिक चार मजल्याची इमारत आहे.या इमारतीत राहणाऱ्या कपासी कुटुंबाच्या रुम नंबर ३०६ ला भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने कपासी कुटुंबाला घराबाहेर पडता आलं नाही. त्यामुळे घरातच होरपळून त्यांचा मृत्यू झालाय. तर त्यांच्या वरच्या मजल्यावर सात जण होते. या सातही जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून त्या सर्वांना कूपर आणि मुकुंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आगीचे नेमकं कारण समजू शकलेले नाही.

मृत व्यक्तींची नावे

दाऊलअली कपासी (८०) तस्लीम कपासी (४२), सकीना कपासी (१४), मोहीन कपासी (१०),अशी मृतांची नावे आहेत. तर इमारतीमधील अन्य सात रहिवासी या आगीत जखमी झाले आहेत.

जखमींची नावे 

इब्राहिम कोठारी(५७)  सकीना कोठारी (५३)  हुसेन कोठारी  (२६)  हजीफा कोठारी (२१)  झारा कटलरीवाला (४२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!