चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
मुंबई- चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला भीषण आग भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. आगीची तीव्रता जास्त असल्याने वाहतूक कोंडी झाली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
शनिवारी दुपारच्या सुमारास आर. के. स्टुडिओला अचानक भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
स्टुडिओत लागलेल्या आगीची तिव्रता मोठी असल्याने परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे चेंबूरहून सायनकडे, तसेच घाटकोपरकडे जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.