डोंबिवली : डेांबिवली पश्चिमेतील राजूनगर येथील पेट्रोल पंपावर सॅम्पल बकेटला आग लागल्याची घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. यावेळी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास या पेट्रोल पंपावरील सॅम्पल बकेटमधून अचानक धूराचे लोट बाहेर येऊ लागले त्यानंतर आगीने पेट घेतला या प्रकारामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि आजूबाजूच्या रहिवांशांमध्ये धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण रकण्यात आले त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

विशेष म्हणजे भर वस्तीत हा पेट्रेाल पंप आहे. गेल्या सहा महिन्यात दोन वेळा या पंपावर आग लागल्याची घटना घडलीय. या पंपाला भरवस्तीत परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

https://twitter.com/cjournalist4/status/1449418683139252227?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *