अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील वडोल येथील ब्लु जेट हेल्थ केअर या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. धुरामुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला असून ३ ते ४ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरामध्ये ब्लु जेट हेल्थ केअर या केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाल्याने मोठी आग लागली. कंपनीत आग लागल्यानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. अवघ्या काही क्षणात आगीनं रौद्ररुप धारण केलं. आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. केमिकलच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना डोळयांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास झाला. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ, आनंद नगर, उल्हासनगर, बदलापूर येथून अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाडय घटनास्थळी पोहचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!