लोकसभा निवडणुकांची घोषणा, देशात ७ टप्प्यांत मतदान, ४ जूनला निकाल
नवी दिल्ली : लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होईल.
टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा),
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४