डोंबिवली : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दावडी येथील शेतक-यांच्या लढयाला अखेर यश आले आहे. शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील वाद संपुष्टात आला असून, समझोता करार झाला आहे. मात्र काही तथाकथीत मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा कामामध्ये बाधा निर्माण करीत दिशाभूल आणि बदनामीचे षडयंत्र रचीत असल्याचा आरोप शेतक-यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी ती बदनामी थांबवावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा दावडीतील शेतकरी गुरुनाथ शांताराम म्हात्रे, कैलास मोतीराम म्हात्रे, भगवान कुंडलिक ठाकूर, विलास शालिक केणे यांनी दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना सर्व शेतक-यांनी सांगितले की, दावडी येथील जागेसंदर्भात शेतक-यांची लढाई सुमारे २५ ते ३० वर्षापासून सुरू होती. मात्र शेतक-यांचे नेते संतोष केणे यांनी हि लढाई थांबली पाहिजे या हेतूने आपल्या समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला बहुतांश ठिकाणी यश आले. शेतकरी आणि बिल्डर यांची सुयंक्त बैठक बोलावली. या बैठकीत नामवंत कीर्तनकार ह. भ. प प्रकाश महाराज म्हात्रे (सोनारपाडा) व काही शेतकरी वर्ग यांना बिल्डर अजय प्रताप आशर बरोबर समन्वय साधून कोणीही दलाल व दलाली न ठेवता प्रत्यक्ष शेतकरी व बिल्डर यांची मीटिंग लावून शेतकऱ्यांना काय हवय याची विचारणा केली. दावडी गावातील पतितपावन पवित्र भुमीत भगवान श्रकृष्णाचे मंदिराची मागणी शेतक-यांनी केली. ती मागणी मान्य करीत बिल्डरने स्वखर्चाने मंदिर स्थापन करण्याचे आश्वासन दिले. दुसरा मुद्दा शेतकऱ्यांना बिल्डर बरोबर बोलणीमध्ये आजतागायत जे निष्पन्न झाले नाही व केलेली मागणी समाधानकारक नसल्याने त्यावरती ५% वाढीव देण्यात हि ते प्रयत्नशील राहिले होते. म्हणजेच ३५% वर सेटलमेंट झाली. झालेल्या चर्चेमध्ये शेतकऱ्याना बिल्डर कडून कोणालाही अन्याय होणार नाहीं याचीही ग्वाही देण्यात आली.
कुटूंब गेलं, मी पण मरायचे का ?
शेतकरी गुरूनाथ म्हात्रे यांनी सांगितले की, मौजे दावडी मधला सर्वात जास्ती मिळकत असणारा शेतकरी असून माझा मोठा भाऊ कै. सोमनाथ शांताराम म्हात्रे वय ५१ वर्ष दावडी मिळकती विषयी लढाई ची सुरुवात केली होती. मुंबई गोग्रास संस्था ते बिल्डर अजय प्रताप आशर शी लढताना आयुष संपलं आणि माझे दोन्ही भाऊ व वडील,काका, चुलते हि मरण पावले आहेत.
मी स्वतःही मारायचं का ? मी गावासाठी कायदेशीर लढाई लढून त्यात मी स्वतः सर्व शेतकऱ्यांना कोकण आयुक्तांकडून कायदेशीररित्या पीक पाणी लावण्यात यशस्वी झालो. मी व माझे सहकारी शेतकरी यांनी करार करण्याची तयारी दर्शवली. मात्र कोणी शेतक-यांच्या कामात बाधा निर्माण करण्याचा आणि कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकरी आणि बिल्डर अजय प्रताप आशर यांच्यातील समझोता करार (MOU) आधारे दिनांक ०४/१०/२०२३ रोजी सरकारी सर्व्हे ठेवला होता. पण काही कारणास्तव सर्व्हे होऊ शकला नाही. परंतु काही लोक आपल्या स्वार्थासाठी विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आगरी समाजाचे नेते संतोष केणे यांनी सोडविल्याने त्यांच्यांवर तथाकथित मंडळींकडून समाजमाध्यमांवर बदनामीचे आरोप केले जात आहेत. संतोष केणे हे राजकरणात सक्रिय असून समाजाला त्यांचा मोठा आधार आहे. आमच्या जागेकरिता बांधकाम व्यावसायिक विरोधात त्यांनी भूमिअभिलेख, प्रांत,कल्याण तहसिल आणि मंत्रालय दरबारी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वेळोवेळी लढा देत शेतक-यांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांना बळ मिळालं आहे. त्यामुळे भविष्यात कोणीही त्यांची बदनामी करू नये अन्यथा गंभीर परिणाम सामोरे जावे लागेल असा इशारा दावडीतील शेतक-यांनी दिला आहे.