मुंबई : मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) छापा टाकून रेव्ह पार्टी उधळून लावीत १२ लोकांना अटक केलीय. एनसीबीने मोठया प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केलय. याप्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यापूर्वीही अनेकवेळा बॉलीवूडमधील कलाकार अंमली पदार्थाच्या जाळयात अडकले आहेत. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला अंमली पदार्थाचा विळखा बसल्याचे स्पष्ट होतेय.

मायानगरी मुंबईत अंमली पदार्थाचे जाळे मोठय़ा प्रमाणावर पसरल्याचे पुन्हा उघड झाले आहे. अगदी झोपडपट्टीतल्या छोटय़ा गल्ल्यांपासून उच्चभ्रू वर्ग, फिल्म इंडस्ट्रीला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. मुंबईत अंमली पदार्थ पुरविणारी टोळी सक्रिय झाली आहे. अगदी झोपडपट्टीपासून ते हाय प्रोफाइल सोसायटय़ांमध्येही अंमली पदार्थाचे मोठय़ा प्रमाणावर सेवन होतय.


अंमली पदार्थांमध्ये हेरॉइन, चरस, कोकेन, गांजा, अफू, अ‍ॅंफेटामाईन आदी पदार्थाचा समावेश होतो. कोकेनचा व्यवहार करणारे बहुतांश नायजेरीयन नागरिक आहेत. अ‍ॅंफोटामाईन सगळ्यात महाग आहे. ते परदेशात पुरवले जाते. चेन्नईहून ते मुंबईत आणले जाते. येथून ते तस्करी मार्गाने मलेशिया, दुबई आणि सौदी अरेबिया आदी देशांत पाठवले जाते. महिलांचा वापर या तस्करीमध्ये होत असल्याचे यापूर्वी हवाई गुप्तचर विभागाने केलेल्या कारवायांमध्येही स्पष्ट झाले आहे.

ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र- मुंबई करा : रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शहारूख खानच्या मुलगा असेल अथवा कोणीही असेल त्याला अटक करण्यात आलीय. त्यामुळे या प्रकरणात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंमली पदार्थाची मोठया प्रमाणात लागण झालीय. सुशांतसिंह राजपूत च्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आलय. याठिकाणी ड्रग्जचे जाळं मोठया प्रमाणात पसरलं आहे. त्याची माहिती एनसीबीला मिळाल्याने त्यांनी कारवाई केलीय. त्यामुळे ड्रग्ज मुक्त महाराष्ट, ड्रग्ज मुक्त मुंबई केली पाहिजे या सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रयाकडे आमची मागणी आहे असे आठवले म्हणाले.

डोंबिवलीतील पिडित मुलीला रिपाइंकडून १ लाखाची मदत

डोंबिवलीमधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे १ लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली. अत्याचार पीडित मुलीच्या सर्व कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.मुंबईत साकिनाका येथे अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्यातील पीडितेच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी 20 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्या प्रमाणे डोंबिवलीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने 20 लाखांची सांत्वनपर मदत देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *