ठाणे : माहेरून पैसे आणण्याकरीता विवाहतेचा शारीरिक आणि मानसिक छळ करुन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार चार करणारा पती व कुटुंबातील अन्य चार सदस्यांवर मुंब्रा पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.
सदर तरुणीला मुंबईतील मर्जी संघटनेची माहिती मिळताच संघटनेच्या शोषणमुक्त भारत अभियानाअंतर्गत तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली. त्याआधारे मर्जी संघटनेने केलेल्या मार्गदर्शनाअखेर पीडीतेने दिलेल्या लेखी तक्रारी आधारे मुंब्रा पोलिसांनी भा.दं.वि.सं. कलम ३७७, ४९८-ए, ३२३, ५०४, ३४ अंतर्गत पीडीतेचा पती व सासरच्या अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुंब्रा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक के. के. तांबे पुढील तपास करीत आहेत. लग्नात पीडीतेच्या माहेरच्या मंडळीनी तिला सहा तोळे सोन्याचे दागिने दिले असून हे दागिने आरोपींनी स्वत:कडे ठेवल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. दरम्यान न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्यायग्रस्तांनी मर्जी संघटनेस संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या कायदेविषयक सल्लागार ऍड. तृप्ती पाटील, समन्वयक रिंकू लोखंडे, प्रियांका राजगुरू यांनी केले आहे.