कल्याण : दुकानासमोर गाडी पार्क केल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी मिळून दोन एमआर ला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिम बैल बाजार परिसरातील नित्यानंद हॉस्पिटल परिसरात घडली. सदर घटना मोबाईल कॅमे-यात कैद झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत एक गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेनंतर कल्याण पश्चिमेतील सर्व एमआर कर्मचाऱ्यांनी काम बंद करत बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करीत मारेक-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *