मुंबई : ‘ फतवा ’ चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटात वेगळया पध्दतीने मांडलेली लव्ह स्टोरी आहे. अभिनेता प्रतिक गौतम मुख्य भुमिकेत आहे. अवघ्या २४ वर्षाच्या प्रतिक गौतमनं चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे कथानक प्रत्येकाच्या ओळखीचं आहे. ही गोष्ट आपल्या प्रत्येकाने आजूबाजूला बघितली, ऐकलीय, अनुभवलीय, पण पडद्यावर पहिल्यांदा आलीय. त्यामुळे ‘ फतवा ’ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे.

 फतवा हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटात गावकडच्या दोन जीवांच्या गुलाबी प्रेमाची कथा पहायला मिळते. समाजातील विषमतेची वैचारीक दरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य भुमिकेतील प्रतिक गौतमनं पहिल्यांदाच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन उत्कृष्ट केलंय. प्रतिक गौतम आणि श्रध्दा भगत ही नवी जोडी चित्रपटात आहे. एका वेगळ्या खलनायिकी भूमिकेत छाया कदम  आहेत.  मिलिंद शिंदे, नागेश भोसले, पूनम कांबळे, अमोल चौधरी, संजय खापरे, निलेश वैरागर, निखिल निकाळजे, निकिता संजय आदी सहकलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. वेगवेगळया ढंगातील गाणी तसेच नवीन कलाकरांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. ‘ फतवा ’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडला असून, हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे.

प्रतिकने अवघ्या २४ व्या वर्षी फतवा दिग्दर्शित केलाय. प्रतिकला फतवा बनवायला साडेपाच- सहा वर्षे लागली आहेत. चित्रपट निर्मितीसाठी त्याला डॉ यशवंत यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळेच हा चित्रपट पूर्ण होऊ शकला आहे अशी भावना प्रतिकचे वडील गौतम निकाळजे यांनी व्यक्त केलीय. एवढया कमी वयात चित्रपट लिहिणे आणि दिग्दर्शन करणे खूपच अवघड काम होते, मात्र हे शिवधनुष्य प्रतिकने पेललंय. फतवा सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पहावा असे आवाहनही त्याच्या वडीलांनी केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!