मंगेश तरोळे-पाटील
अमरावती : कोळी महादेव जमातीवर होत असलेल्या अन्याय विरोधात अमरावती विभागाच्या वतीने अमरावती येथे ६ डिसेंबर २०२३ पासून आमरण उपोषण बसणार असल्याची माहिती आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ अध्यक्ष राजेंद्र जुवार यांनी दिली.
जिल्हा मराठी पत्रकार भवन, वालकट कम्पाऊंड, धर्मदाय काँटन फंड समोर, अमरावती येथे सदर पत्रकार परिषदेत घेण्यात आली यावेळी त्यांनी कोळी महादेव जमातीवर होत असलेल्या अन्याया संदर्भात ऐतिहासिक पुराव्यासह सविस्तपणे माहिती देण्यात आली. आमरण उपोषणासाठी राजेंद्र जुवार, गजानन चुनकीकर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषेदेमध्ये राजेंद्र जुवार, गजानन चुनकीकर, रघुनाथ खडसे, सुधाकरराव घुगरे, डॉ अशोक कोलटके, भास्करराव कोलटके, गोपाळराव ढोणे, उमेश ढोणे अॅड.गोपाळराव डांगरे, गजानन वानखेडे, विवेक जवांजल, सुनील ढोरे, संदीप धांडे, अशोक कोलटके, संतोष कोलटके, अतुल देशमुख, मोहन जामनेकर, सुभाष टापरे , घाटे, सिंधुदूर्ग सावंतवाडीवरून प्रकाश पाटील(फुकट), इत्यादी जमात बांधव उपस्थित होते.