शहापुरात ज्योती गायकवाड यांचे आमरण उपोषण

ठाणे : शहापूर नगर पंचायत हद्दीत राज्य सरकारच्या ३० लाखांच्या निधीतुन कमान उभारण्यात आली आहे.या कमानीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तथा समाजसेवक, आरपीआयचे नेते दिवंगत भगवान गायकवाड मार्ग असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या मागासर्गीय विभागाच्या जिल्हा प्रमख ज्योतीताई गायकवाड यांनी शहापूरात आमरण उपोषण सुरू केले आहे.


स्थानिक नगरसेवकाने नामकरण करताना कमानीवर दिवंगत भगवान गायकवाड यांचे नाव जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर डावलले आहे.असा आरोप ज्योतीताई गायकवाड यांनी केला आहे.यामुळे नगर पंचायतीने एकूण ३० लाख रुपये राज्य सरकराचा निधी खर्च करून उभारलेल्या कमानीच्या नामकरणावरून आता वाद निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे या कमानीला कोणाचे नाव देण्यात यावे असा ठराव नगसेवकांच्या बैठकीत अद्यापही मंजुर करण्यात आला नाही. मात्र गेल्या आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या कमानीचे लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मात्र त्यापूर्वीच या कमानीला स्थानिक भूमिपुत्र दिवंगत नेते भगवान गायकवाड यांचे नाव देण्यासाठी २०२१ साली जिल्हा प्रमुख ज्योती गायकवाड यांनी शहापूर नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान नगरपंचायतीने उभारलेल्या कमानीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार व समाजसेवक, दिवंगत नेते भगवान गायकवाड मार्ग असे नामकरण केले जात नाही. तोपर्यंत आमचे आमरण उपोषण आंदोलन सुरू राहणार असल्याचे जाहीर करत उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचे ज्योतीताई गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!