मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.देसाई यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे. 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे ‘हरिश्चंद्र फॅक्टरी’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाला.

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या राजा शिवछत्रपति या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेची निर्मिती केली होती. जी मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती.

लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!