मुंबई : चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोध नेत्याचं नाव लिहिण्यात आल नव्हतं त्यामुळे भाजपने या उद्घाटन सोहळयावर बहिष्कार टाकला होता. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच नारायण राणे यांनी या विमानतळासाठी पुढाकार घेतल्याचं म्हटलंय.
‘कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे! सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झाले’. असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय