श्री गणेश मंदिर देवस्थान परिसर शतक महोत्सवी वर्षी उजळला

मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने विद्युत रोषणाई

डोंबिवली : डोंबिवलीच्या फडके रोड परिसरात दरवर्षी मनसे आमदार राजू पाटील यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई केली जाते. यंदा डोंबिवलीच्या प्रसिद्ध श्री गणेश मंदिर देवस्थानच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर परिसराला देखील आकर्षक विद्युत रोषणाई मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने करण्यात आली असून फडके रोड परिसर आणि मंदिर परिसर हे विद्युत रोषणाईने उजाळले आहेत.

हिंदू नवं वर्ष आणि दिपावलीला डोंबिवलीच्या फडके रोड वर मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर एकत्र येत असतात. या परिसराला मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने विशेष आकर्षित विद्युत रोषणाई केली जात असते. यंदा देखील ही विद्युत रोषणाई अधिक आकर्षक करण्यात आली आहे. श्री गणेश मंदिर देवस्थानच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर परिसरात देखील विशेष आकर्षित विद्युत रोषणाई केली गेली आहे. यंदा शतक महोत्सव श्री गणेश मंदिराचा असल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मंदिर परिसराला विद्युत रोषणाई आपल्याकडून करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी देवस्थानसमितीने देखील तात्काळ मान्यता दिली होती.

शुक्रवारी सायंकाळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक,विश्वस्त राहुलजी दामले यांच्या हस्ते या विद्युत रोषणाईने लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत,मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा दिपीका पेडणेकर, जिल्हा संघटक हर्षद पाटील,उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक, योगेश पाटील,डोंबिवली विधानसभा अध्यक्ष डोंबिवली प्रल्हाद म्हात्रे, ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे,उदय वेळासकर,शहर सचिव संदीप म्हात्रे महिला शहर सचिव कोमल पाटील व मोठ्या संख्येने डोंबिवलीकर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!