डोंबिवली/ प्रतिनिधी : एमआयडीसी परिसरातील अंबर केमिकल कंपनीत रिऍक्टरचा  स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे. आज रक्षाबंधन  असल्याने कंपनी बंद होती कंपनीत कोणीही कामगार नव्हते. कंपनी च्या बाहेर सुरक्षा रक्षक होता कंपनीत स्फोटाचा आवाज झाल्यानंतर तो भयभित होऊन पळाला. कंपनीत कोणीही नसल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र स्फोटाच्या हादऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. या स्फोटाने  प्रोबेस कंपनी च्या स्फोटची आठवण झाली. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!