डोंबिवली :-बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील आनंद बालभवन येथे डोंबिवलीत चित्रकला क्लासेसच्या वतीने ‘कलाविष्कार’ या चित्रप्रदर्शनाचे १८ व १९ नोव्हेंबर असे दोन दिवसांचे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात ७ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांमुलींनी साकारलेली कलाकृतीं पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.
चिमुकल्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व डोंबिवली शहराचे नाव देशपातळीवर नव्हे तर जागतिक स्तरावर उंचावणे याकरता हे प्रदर्शन भरविल्याचे यावेळी शिक्षिका श्रुती चौघुले यांनी सांगितले. प्रदर्शनात पेन्सिल, कलर पेन्सिल चित्रे, वॉटरकलर चित्रे,३ डी, एलिमेंटरी आणि इंटरमीडियट ग्रेड परीक्षाची चित्रे आहेत.
सदर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शताब्दी पुरस्काराने सन्मानित , उत्कृष्ट चित्रकार व मुख्याध्यापक श्रीधर केळकर आणि अनेक प्रसिद्ध चित्रकार ,शिल्पकार तसेच अरुण कारेकर(रायगड जिल्हा),शिल्पकार सिद्धार्थ साठे (कल्याण), सुलेखनकार राम कस्तुरे ( डोंबिवली)
उपस्थित होते. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून व चित्रकार मुलांना प्रोस्थाहन म्हणून जास्तीत जास्त कला प्रेमींनी ह्या कलाविष्कार चित्रप्रदर्शनास भेट द्यावी शिक्षिका चौघुले यांनी सांगितले.