ठाणे /प्रतिनिधी : लोकहित या शहापूर तालुक्यात स्थापन झालेल्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश गोविंद पाटील यांची निवड झाली आहे. शहापूर शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी या संघटनेच्या निवडीबाबत जेष्ठ पत्रकार भरत उबाळे, व संजय सुरळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यामध्ये मंगेश पाटील यांची संघाच्या अध्यक्षपदी तर संघटनेच्या सचिवपदी बबन गायकवाड, सहसचिव साजिद शेख तर उपाध्यक्षपदी अविनाश उबाळे, जनार्दन भेरे, ओमकार पातकर, कोषाध्यक्षपदी दिलिप कांबळे यांची निवड झाली. तसेच संघटनेच्या सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार संजय सुरळके, भरत उबाळे, बी.डी.गायकवाड तर सदस्यपदी पंडीत मसणे, मनिष दोंदे, अनंत बोरसे, बाळाराम गोळे, प्रकाश जाधव, शिवाजी पाटील यांची निवड झाली आहे. दरम्यान, या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमासह पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संघटनेच्या झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.