एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर पादचारी पुलाच्या पायरीवर रेल्वेकडून प्रवाशांसाठी संदेश
घाटकोपर ( निलेश मोरे ) : परेल – एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटने नंतर रेल्वे प्रशासनाला कमालीची जाग आल्याचे दिसून येतय. करीरोड स्थानकाशेजारी बांधलेल्या नव्या पुलाच्या पायरीवर प्रवाशांना सुचना देणारे संदेश रेल्वे प्रशासनाकडून लिहिण्यात आले आहे.
एल्फिन्स्टनवरील चेंगराचेंगरीत अनेक प्रवाशांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने प्रवाशांना सावध पवित्रा घेण्याच्या सुचना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुलाच्या पायरीवर वेगवेगळया रंगाने संदेश लिहिले आहेत. हे संदेश हिंदीत लहिले आहेत. पुलावर धक्का बुक्की करू नका, पुलावर गर्दी करू नका ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या स्वच्छता राखा अशा सुचना पादचारी पुलावर लहिण्यात आल्या आहेत. मुंबईतील करीरोड रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन पादचारी पूल बांधला असून लवकरच हा पूल प्रवाशाना खुला करण्यात येणार आहे . करीरोड स्थानकाला लागून पूर्व व पश्चिमेस जाण्यासाठी प्रवाशाना एकच ब्रिटिश कालीन पूल असल्याने वाढत्या गर्दीमुळे नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले .