डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला भीषण आग
डोंबिवली : पूर्वेतील सारस्वत कॉलनी पंचायत बावडीजवळील राणा टॉवर येथील जे.के. एन्टरप्रायझेसच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली आहे. या आगीत कोटयावधीचा माल जळून खाक झालाय. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
गोदामात एसी, फ्रिज, टी.व्ही, एलईडी टीव्ही संच, वॉशिंग मशिन , ओवन, मोबाइल, कंप्यूटर आदी महागड्या विद्युत उपकरण असा एकूण सव्वा कोटी रूपयाचा माल असल्याची माहिती गोदामाचे मालक अजय जैन यांनी दिली. मात्र आग कशामुळे लागली याची कारण अद्यापि स्पष्ट झालं नाही.