राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण डोंबिवली सोशल मीडिया शहर प्रमुख या पदासाठी सुरेश काटे यांची निवड करण्यात आली आहे
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य पक्षप्रमुख राम राऊत यांच्या उपस्थितीत युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दारात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे या संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे कक्ष प्रमुखांनी सांगितले.
गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधी सिद्धिविनायक ट्रस्ट टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळून देण्यासाठी रुग्णांना मदत करणे सुरेश काटे हे अहमदनगर जिल्ह्याबरोबरच राज्यातील अनेक भागातील संपर्कात असलेल्या रुग्णांना मदत केली आहे त्यांचे भरीव काम पहाता कल्याण डोंबिवली शहर वैद्यकीय सोशल मीडिया शहर प्रमुख पदी राज्याचे वैद्यकीय कक्ष प्रमुख राम राऊत यांनी नियुक्ती केली आहे