मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत संथ गतीने होत असलेल्या मतदानावर आक्षेप घेत उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयाेगाला धारेवर धरले होते. याप्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली हेाती. त्या तक्रारीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मसुद्याची तपासणी सुरू आहे.
२० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हेाते, यावर आशिष शेलार यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ठाकरेंनी खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याने त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली हेाती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नेमके काय झाले याची माहिती सादर करावी अशी सूचना करण्यात आली आहे, त्यानसार राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग यावर अभ्यास करीत असून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का हे पडताळले जात आहे.
़़़़