१२० रिक्षा चालकांना ओळखपत्र वाटप : एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवली : प्रत्येक रिक्षाचालकाविषयी प्रवाशांना माहिती व्हावी या उद्देशाने एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेनेच्यावतीने १२० रिक्षा चालक सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. रिक्षा चालवताना प्रत्येक रिक्षा चालकाने हे ओळखपत्र गळयात घालावे जेणेकरून प्रवाशांना त्याचीसंपूर्ण माहिती मिळेल असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले.
डोंबिवलीतील एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना यांच्या चाैथ्या वर्धापन दिनानिमित्त व शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून हे ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे उपशहरप्रमुख किशोर मानकामे , महीला आघाडीप्रमुख कविता गावंड, एकता रिक्षा चालक मालक सेना अध्यक्ष सुदाम जाधव कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे ,उपाध्यक्ष संभाजी राठोड ,बसराज चव्हाण ,शशिकांत शिंदे; खजिनदार तात्यासाहेब पवार, शहर संघटक कुमार बाबु मंडलिक मनोज नाटकर ,कैलास चव्हाण, युवराज राठोड व सर्व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ओळखपत्रावर रिक्षाचालकाचा पूर्ण नाव लायसन नंबर, बॅच नंबर ,मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता अशी माहिती आहे. .
——————