डोंबिवलीत रिक्षा चालकांच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप 

खासदार डाॅ श्रीकांत शिंदे आणि एकता रिक्षा चालक मालक सेेनेचा पुढाकार 

डोंबिवली :  शिवसेना प्रणित एकता रिक्षा चालक मालक सेना डोंबिवली व कल्याण लोकसभा मतदान संघाचे लोकप्रिय खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांच्या तर्फे रिक्षा चालकांच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी  252 विदयार्थ्यांना 1100 वह्या वाटप केले.  संघटनेच्यावतीने रिक्षा चालकांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाच त्याचाच एक भाग म्हणून वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक  राजेश मोरे,  तालुका प्रमुख  एकनाथ मामा पाटील ,माजी सरपंच उमेश पाटील, संघटनेचे अध्यक्ष सुदाम जाधव, कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे , उपाध्यक्ष संभाजी राठोड  शशिकांत शिदे, बसराज चव्हाण, सरचिटणीस सुनिल भातकर,  खजिनदार तात्यासाहेब पवार बाबु मडलीक, मनोज नाटेकर, ज्ञानेश्वर राठोड कैलास चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.

***

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *