मंत्रालयात  उंदीर  घोटाळा : खडसेची चौकशीची मागणी 
...तर धर्मा पाटलांनी उंदीर मारण्याचे विष प्राशन केलं
मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.   मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाला असल्याचा नवा आरोप खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत केला. तसेच शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याचा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला. मंत्रालयातील उंदीर निर्मूलन हा मोठा घोटाळा असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खडसे यांनी केली.
खडसे म्हणाले की, मंत्रालयात ३ लाख १९ हजार  ४०० उंदीर झाले होते. त्या उंदरांना मारण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. अवघ्या सहा महिन्यात उंदराचे निर्मूलन करण्याच ठरलं पण अवघ्या सात दिवसात उंडायर मारण्यात असल्याचे सांगण्यात आलं. दिवसाला ४५ हजार उंदीर मारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र इतक्या उंदरांची विल्हेवाट काशी कुठे लावली याची माहिती दिली नसल्याचे खडसे यांनी सांगितलं. मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळे धर्मा पाटील यांनी बाहेरून विष आणलं नव्हतं त्यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्याचे औषध घेतलं असे खडसे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!