डोंबिवली : पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर परिसरात आठ फूट महाकाय अजगर आढळला. पॉज चे ऋषिकेश सुरसे यांनी हा अजगर पकडुन त्याला वनविभागाच्या माध्यमातून जंगलात सोडून दिला.

रेतीबंदर डोंबिवली पश्चिमेकडील बांधकाम साईटजवळ मोठा साप आल्याचा कॉल पॉज हेल्पलाईनला आला होता. यावेळी बचावकर्ते ऋषिकेश सुरसे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ८ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथनची सुटका केली. कल्याण परिक्षेत्र वन अधिकारी चेन्ने यांच्या मदतीने निसर्गात सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *