मुंबई : ईद ए मिलाद उन नबी (Eid-e-Milad) हा इस्लाम धर्मीय लोकांसाठी खूप महत्वाचा सण आहे. इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो.
इस्लामच्या दिनदर्शिकेचा तिसरा महिना मिलाद उन-नबी सुरू झाला असून या महिन्याच्या 12 तारखेला 571 ई. मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद(स अ) यांचा जन्म झाला होता. तर पैगंबर हजरत मोहम्मद हे संपूर्ण जगात स्थायिक झालेल्या मुस्लिम लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहेत आणि या कारणामुळे इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्माचा दिवस खूप खास असतो.
मक्का येथे जन्मलेल्या पैगंबर मोहम्मद (स अ) यांचे पूर्ण नाव पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होते. अमिना बीबी अस त्याच्या आईचे नाव होते.तर वडिलांचे नाव अब्दुल्लाह होते. अल्लाहने सर्वात पहिल्यांदा पवित्र कुराण पैगंबर हजरत मोहम्मद यांना दिले. यानंतरच पैगंबरांनी पवित्र कुराणाचा संदेश सर्व लोकांपर्यंत नेला. हजरत मोहम्मद यांनी उपदेश दिला की मानवतेवर विश्वास ठेवणारा व्यक्ती महान आहे.
ईद-ए-मिलाद-उन्-नबी म्हणून पैगंबर हजरत मुहम्मद स अ यांचा जन्मदिवस, लोक मशिदी आणि घरांमध्ये पवित्र कुराण वाचतात आणि पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित होतात. यावेळी त्याचे संदेश वाचण्याबरोबरच गरिबांना दान करण्याची प्रथा आहे. धर्मादाय किंवा जकात इस्लाममध्ये खूप महत्वाचे मानले जाते. गरजू आणि गरीब लोकांना मदत केले तर अल्लाह प्रसन्न होतो असा विश्वास आहे.
असा आहे इतिहास
इस्लाम कॅलेन्डरच्या तिसऱ्या महिन्यातील 12 तारखेला, इसवी सन पूर्व 517 मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा
मुंबई, दि. 19 :- ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया, उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊया. यातून प्रेषितांना अभिप्रेत समाज निर्माण होईल, सुख, समृद्धी नांदेल. त्यासाठी ईद-ए-मिलादाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा