१९७५ सालापासूनच्या विद्यार्थी शिक्षकांनी जागवल्या आठवणी ….
नवी मुंबई : बाल विद्यामंदिर, परभणी येथील शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणऋषी म. शं. शिवणकर सर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन सोहळा नुकताच वरुणावतार झुलेलाल मंदिर, नेरुळ, नवी मुंबई येथे शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक वृंद, शिक्षकेतर माजी कर्मचारी व मुंबई तसेच आसपासच्या परिसरातील माजी विद्यार्थीगण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी १९७५ पासूनच्या बॅच चे जवळपास १०० विद्यार्थी हजर होते. त्या काळातले २३ शिक्षक ७ शिक्षिका हजर होत्या. यावेळी अनेकांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था हि परभणी येथील नावाजलेली शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतील पाच माजी शिक्षकांना राज्यपालांच्या हस्ते आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. शिक्षणऋषी म. शं. शिवणकर सर यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. ते दिव्यांग असून देखील त्यांनी तीन विद्यार्थ्यांना घेऊन ज्ञानदानाचे कार्य वर्ष १९४८ पासून सुरू केले. त्यांनी १९४८ मध्ये लावलेले रोपटे हे आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. आज रोजी संस्थेमध्ये साधारणतः ४५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नुसते ज्ञान न देता त्याबरोबर संस्कारही देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. यामुळे बाल विद्यामंदिर, शिक्षण संस्था हि नुसती शिक्षण संस्था न होता संस्कार केंद्र देखील संरामुळे झालेले आहेत. शिवणकर संराचा राज्यपालांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील महत्वपुर्ण कामगिरी बद्दल गौरव करण्यात आला होता. शिवणकर संराच्या शिक्षण व विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, त्याचा त्याग, कर्मचा-यांप्रती असलेले प्रेम हे सर्व गुण वाखाण्या जोगे आहेत. त्यांच्या महान कार्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आसपासच्या परिसरातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी मानाचा मुजरा केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. एम.ए. व्ही.एम. औंडेकर, नट डी. दीक्षित, डी.एस्सी. व्ही.एस.एस. राके, के.एस. डी. अडणे, व्ही.जी. कुलकर्णी, पुष्पा देव आणि माजी विद्यार्थी प्रतिनिधी अनिल गांडी, रमेश खिस्ते, अरविंद घुगे, विश्वास सबनीस यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन, शिक्षणऋषी M.Sc. शे.एस. शिवणकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दिप प्रज्वलनानंतर रुपाली फडके यांच्या सुरेल आवाजात सरस्वती स्तवन व सुजित देशपांडे यांनी शिवणकर सरांच्या कार्यावर शब्दबध्द केलेल्या कवितेचे गायन सादर केले. त्यानंतर बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे दिवंगत शिक्षक व कर्मचारी यांचे स्मरण करून भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मुंबई कार्यक्रमाची आयोजन समिती व माजी विद्यार्थी विजय लहाने व अरुंधती तारे लहाने यांच्या वतीने उपस्थित माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित प्रेमपूर्वक व आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. माजी शिक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने अभिवादन सोहळयाची सुरूवात झाली. तदनंतर माजी मु.अ. वि. म. ओढेकर यांनी माजी विद्यार्थ्यांना शिवणकर संराच्या कार्याबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले. माजी शिक्षक के.डी आडणे सरांनी शिक्षणऋषी शिवणकर गुरूजींचा जीवनपट त्याचे कार्य व त्यांचा त्याग या सर्वांचे इतंभूत माहिती माजी विद्यार्थ्यांसमोर सादर केली. तसेच निर्मला जंगली, रेखा येळंबकर व एम. बी. कंधारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी मु.अ. बी.डी. दिक्षित व डी. व्ही. राके यांनी वर्ष २०२४, म.शं. शिवणकर जन्मशताब्दी वर्षाच्या दृष्टीने घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमाच्या तयारीसाठी नियोजन सादर केले. तद्नंतर माजी विद्यार्थी प्रतिनिधी अनिल गंडी, प्रविण आरळकर, सतिश करपे, गोविंद क-हाडे, विलास जहाँगिरदार, अरविंद घुगे, . दुर्गादास पांडे, रमेश खिस्ते,. संगीता जोशी . ज्योती पेरके, यांनी शाळेच्या जुन्या आठवणी व शिवणकर सरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे उपक्रम हया संदर्भात मनोगत व्यक्त केले. तसेच टीव्ही व सिने कलाकार अजिंक्य राऊत यांनी देखील उपस्थित राहुन शाळेच्या आठवणीना उजाळा दिला. मंजुषा शेळगावकर व अनघा लंगर भालेराव यांनी सुत्रसंचालन केले. अनिता पहिणकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता अनघा लंगर भालेराव यांचे पसायदान व स्वामी सर यांच्या सुचनेनुसार सामुहिक राष्ट्रगीताने झाली. शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी नरेश तलरेजा ह्यांचे कार्यक्रमाचे स्थळ व इतर नियोजनामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.
माजी विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई व आसपासच्या परिसरातील बाल विद्यामंदिर, परभणी या शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, संराच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व आपल्या शाळा मित्राच्यां संर्पकात राहण्यासाठी के. डी. आडणे सर, मोबाईल.नं. ९४२२१७९३२१ व विश्वास सबनिस मोबाईल नं. ९३२६२७६८९६ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे