मुंबई : शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? ‘, असं संतप्त सवाल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी, राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, यासह अनेक विविध मागण्यांसाठी शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या पुढाकारातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

केसरकर म्हणाले की, ”शाळेच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. सगळ्यात जास्त निर्णय घेणारा मी मंत्री आहे. शिक्षक गावी राहत नसतांना सुद्धा भत्ते घेतात, याकडे मी जाणून बुजून दुर्लक्ष केलंय. शिक्षकांबाबत सर्व चांगले निर्णय घेऊन आमची बदनामी केली जातेय. शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद होत नाही. एकही शाळा बंद केली जाणार नाही आणि एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही, हा निर्णय जाहीर केलाय. कुठल्या अधिकारात मोर्चे निघत आहेत, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय असेही ते म्हणाले.

केसरकर म्हणाले, लोकांना भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची आहेत. विद्यार्थ्यांना राजकारणापासून लांब ठेवा, असं विनंती त्यांनी केली आहे. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार असाल तर मला भूमिका घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मोर्चाला आणणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी लागेल असेही शिक्षणमंत्रयांनी ठणकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!