मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ सुरेश वामनगीर गोसावी आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी तिन्ही कुलगुरूंच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!