डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परिक्षेत डोंबिवलीचे सुवर्ण यश
ओजस जोशी आणि तनुज वैद्य ने पटकावले सुवर्ण पदक
डोंबिवली : डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत डोंबिवलीतील दोन विद्याथ्र्यांनी सुवर्ण यश मिळवलंय. विद्यानिकेतन शाळेतील सहावीत शिकणारा ओजस अमोघ जोशी आणि टिळकनगर शाळेचा नववीत शिकणारा तनुज वैद्य या दोघांनी सुवर्ण पदक पटकावलंय. तर टिळकनगर शाळेची सुकन्या औटी व लोकमान्य गुरूकूल शाळेचा यश थोरात या सहावीत शिकणा-या दोन्ही विद्थ्र्याने रौप्य पदक तर नंदन कारले याने बाँझ पदक पटकावलंय. डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते यशस्वी विद्याथ्यांना गौरविण्यात आले.
या परिक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी अवघे ४६८ विद्यार्थी हे अंतिम फेरीत पोहचले होते. बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण जतन व संवर्धनाची अभिरुची निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. लेखी, प्रात्यक्षिके, पर्यावरण जतन व संवर्धनावर आधारित कृतिसंशोधन प्रकल्प, मुलाखत अशा चार वेगवेगळ्या टप्प्यात ही परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत डोंबिवलीतील विद्याथ्याँनी यश संपादन केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.