कल्याण : कल्याण पश्चिम येथील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी च्या नावाखाली करण्याचा घाट महापालिकेचे अधिकारी यांनी घातला असून हे उद्यान वाचविण्यासाठी एकजूट व्हा असे आवाहन कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाबा रामटेके यांनी केले आहे.
बाबा रामटेके यांनी सांगितले की, 1965 सालापासून आंबेडकर उद्यान आहे मात्र हे उद्यान नष्ट करण्यासाठी आज पर्यंत तीन वेळा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कटिंग करण्यात आले. दोनदा मुरबाड रोड साठी आणि एकदा रुक्मिणीबाई हॉस्पिटल साठी रस्ता रूंदीकरण करण्यात आले. आता पून्हा स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस पुलाच्या नावाखाली अर्धे उद्यान घेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप रामटेके यांनी केला आहे, पालिकेतील काही अधिका-यांकडून हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आज हे उद्यान मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान कोणत्याही प्रकारे नष्ट होता कामा नये. त्यासाठी महापालिकेच्या आयुक्तानी हरकती मागवल्या आहेत. तरी हरकती घ्या. आणि उद्यान वाचविण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन रामटेके यांनी केले आहे.